Gulliver's Travels(Paperback, Marathi, Hari Krishna Damale)
Quick Overview
Product Price Comparison
आयर्लंड देशात स्विफ्ट् नामेकरून एक मोठा बिख्यात ग्रंथकार गेल्या शतकात होऊन गेला. त्याचा अत्यंत प्रसिद्ध ग्रंथ 'गलिव्हर्स ट्राव्हल्स्' त्याच्या काही प्रसिद्ध प्रकरणाचे भाषांतर मराठी वाचकांकरिता तयार केले आहे.सदरील ग्रंथाचा मुख्य उद्देश मनोरंजन हा तर आहेच; पण मूळ ग्रंथकाराचा उद्देश याहून खोल होता. तो हा की, त्या वेळेस जी राजकारस्थाने चालत असत, जे मंत्रिमंडळ होते, जे विख्यात शोधक होते, आणि एकंदर जी लोकस्थिती होती, त्याविषयी उपरोधोक्तीने लिहून त्यांचा उपहास करावा. हा त्याचा गुप्त हेतू त्या वेळेसही सामान्य वाचकांस प्रथमतः कळून आला नाही; व हल्ली तर त्या काळाला सुमारे दीडशे वर्षांहून अधिक गेल्यालाही त्याच्या उपरोधोक्तीचा रोख स्पष्टपणे ध्यानात येण्यास फारसा मार्गही उरला नाही. तरी ग्रंथकाराने आपल्या पात्राच्या तोंडून जे अभिप्राय वदवले आहेत व त्याचे स्वतःचे जे उद्गार ठिकठिकाणी निघालेले आहेत, त्यावरून मार्मिक वाचकांस सदरील प्रकार जागोजाग आढळल्यावाचून राहणार नाही.हे भाषांतर केवळ शब्दश: केले नसून मराठी भाषेला जसे गोड दिसेल तसे उतरलेले आहे. काही ठिकाणी थोडेबहुत फेरफारही करावे लागले आहेत.