Mi Nastik Kasa Zalo Ani Itar Nivadak Lekh(Paperback, Y. N .Walawalkar) | Zipri.in
Mi Nastik Kasa Zalo Ani Itar Nivadak Lekh(Paperback, Y. N .Walawalkar)

Mi Nastik Kasa Zalo Ani Itar Nivadak Lekh(Paperback, Y. N .Walawalkar)

Quick Overview

Rs.300 on FlipkartBuy
Product Price Comparison
या पुस्तकांतील "मी नास्तिक कसा झालो? हा भाग केवळ बारा पानांचा आहे. तो यापेक्षा मोठा हवा होता. अधिक लिहायला हवे होते. " असे कांही वाचक म्हणतील. "मी नास्तिक कसा झालो?" यासंबंधी लिहिणे म्हणजे "आत्मचरित्र" लिहिणे नव्हे. बालपणापासून जे-जे घडले ते-ते आठवून आठवून त्यांतील जेवढे या पुस्तकाच्या विषयाशी निगडित होते तेवढेच इथे घेतले आहे. आमच्या गावी इ.पाचवीपर्यंतच शाळा होती. त्यामुळे इयत्ता सहावीत मी शाळेत गेलोच नाही. घरी अभ्यास केला. तालुक्याच्या गावी जाऊन वार्षिक परीक्षा दिली. यासाठी परवानगी मिळाली. उत्तीर्ण होऊन सातवीत गेलो. सातवीचे वर्ष महत्त्वाचे असल्याने शाळेत जाणे भाग होते. म्हणून आमच्या गावापासून सात कि. मि. दूर असलेल्या बांदा या गावातील शाळेत प्रवेश घेतला. तिथले गायतोंडे मास्तर हे माझ्या वडिलांचे मित्र होते. त्यांच्या घरी राहायचो. दर शनिवारी शाळा सुटल्यावर शाळेतूनच सात कि.मि. चालत माझ्या घरी जायचो. मग सोमवारी घरी लौकर जेऊन शाळेसाठी निघायचो. शाळा सुटल्यावर गायतोंड्याच्या घरी जायचो. ही जा-ये करण्यात त्याकाळी अनेक अडचणी आल्या. ते सगळे "मी नास्तिक कसा झालो? " या लेखात घेतले नाही. घेतले असते तर कांही जणांना कदाचित आवडले असते. पण ते पुस्तकाच्या विषयाशी संबंधित नव्हते म्हणून लेखात समाविष्ट केले नाहीत. या पुस्तकातील लेखांची संख्या एकोणसाठ आहे. त्यांतील कांही थोडे (सात-आठ) लेख पूर्वीच्या पुस्तकांत आले आहेत. तसेच ते निवडक म्हणून या पुस्तकातही समाविष्ट केले आहेत.