The Fallen (Marathi)(Paperback, Marathi, David Baldacci, Madhav Karve) | Zipri.in
The Fallen (Marathi)(Paperback, Marathi, David Baldacci, Madhav Karve)

The Fallen (Marathi)(Paperback, Marathi, David Baldacci, Madhav Karve)

Quick Overview

Rs.550 on FlipkartBuy
Product Price Comparison
'फॉलन' म्हणजे गुन्हेगारांचा कर्दनकाळ असलेल्या अॅमॉस डेकर ह्या डेव्हिड बॅल्डासींच्या जगावेगळ्या नायकाची गुन्हेगारीशी चित्तथरारक, जीवघेणी झुंज... फुटबॉलमधल्या धडकेमुळे डेकरमध्ये उदभवलेली, कल्पनेच्या पलीकडची, अचाट स्मरणशक्ती गुन्हेगारी हिकमतीनं उघडकीला आणणारं वरदान ठरतं...बॅल्डासींच्या ह्या वाचकप्रिय नायकाच्या थरारक कादंबरीमध्ये अॅमॉस डेकर, सहकारी जेमिसनबरोबर बैरनव्हील नामक छोट्या शहरात सुट्टीवर आलेला आहे... इथल्या, जेमिसनच्या बहिणीकडच्या मुक्कामातल्या पहिल्याच वादळी रात्री, शेजारच्याच घरात दोन हत्या होतात... डेकर आणि जेमिसन ह्या हत्यांच्या तपासात लक्ष देत असतानाच अशा मुहेरी हत्यांचं सत्र चालू राहातं...एकीकडे अंमली द्रव्यांच्या व्यसनांचं विषारी वातावरण. तर दुसरीकडे, अतोनात पिळवणुकीच्या भयंकर पाश्र्वभूमीवरच्या प्रचंड बॅरन इस्टेटमधल्या गुप्त खजिन्याच्या दचकवणाऱ्या कहाण्या उजेडात येत राहातात... जिवावरच्या संकटांना तोंड देत, सतत हुलकावणी देणाऱ्या गुन्हेगारांची पाळंमुळं खणून काढणान्या डेकरचा आणखी एक श्वास रोखायला लावणारा रहस्यवेध...