Windmills Of Gods (Marathi)(Paperback, Marathi, Sidney Sheldon, Dr. Ajit Katre)
Quick Overview
Product Price Comparison
श्रीराम बुक एजन्सी c/o वेदांत पब्लिशिंग हाऊस - पुणे, आंतरराष्ट्रीय राजकारणातील कारस्थानांना बळी पडलेल्या एका महिलेची ही कहाणी आहे. कॅन्सास विद्यापीठात राजशास्त्र शिकवणाऱ्या तरुण आणि बुद्धिमान प्राध्यापिका आणि दोन मुलांची आई असलेल्या मेरी अॅश्ले ह्या कादंबरीच्या नायिका आहेत. राजकारणात कोणताही अनुभव नसताना केवळ रुमानिया आणि इतर कम्युनिस्ट राष्ट्रांच्या संबंधी त्यांचे अभ्यासपूर्ण लेख वाचून आणि त्यासंबंधी त्यांचे अगदी नवीन प्रकारच्या विचारांमुळे प्रभावित होऊन, अमेरिकन अध्यक्ष त्यांची रुमानियात राजदूत म्हणून नेमणूक करतात. त्यांच्या नियुक्तीपासूनच पुढील नाट्यपूर्ण आणि खळबळजनक घडामोडींचा प्रारंभ होतो. एकदा वाचायला सुरुवात केल्यानंतर संपेपर्यंत खाली ठेवण्याची इच्छा होऊ नये अशा प्रकारच्या पुस्तकात या कादंबरीचा नक्कीच समावेश होऊ शकेल.