Arthasakshar Vha ! (Marathi) + Let's Talk Mutual Funds (Marathi) - Combo of 2 Books | Zipri.in
                      Arthasakshar Vha ! (Marathi) + Let's Talk Mutual Funds (Marathi) - Combo of 2 Books

Arthasakshar Vha ! (Marathi) + Let's Talk Mutual Funds (Marathi) - Combo of 2 Books

Quick Overview

Rs. on ShopcluesBuy
Product Price Comparison

गेली दोन दशकं, गुंतवणुकीचा पसंतीचा पर्याय म्हणून म्युच्युअल फंड्स भारतीयांसाठी उदयास आले आहेत. ते रोकडसुलभता देतात. त्यात प्रवेश करणं आणि बाहेर पडणं त्यातून मिळणाऱ्या परताव्यासहित सहजसाध्य असतं. त्यामुळे सोनं, स्थावर मालमत्ता किंवा मुदत ठेवींसारख्या पारंपरिक गुंतवणुकीपेक्षा, म्युच्युअल फंड्स हा एक नैसर्गिक निवडीचा पर्याय झाला आहे. परंतु म्युच्युअल फंडाची लोकप्रियता वाढलेली असली, तरी आपल्या फायद्याप्रमाणे त्यांचा वापर करण्याची क्षमता वाढलेली नाही. म्युच्युअल फंडांचे पर्याय हजारो असल्यामुळे गुंतवणूकदारांची मति कुंठित होऊन जाते. बेस्टसेलिंग लेखिका आणि भारतात आर्थिक विषयांवर लिहिणाऱ्या मोनिका हालन या पुस्तकाद्वारा पुन्हा पदार्पण करत आहेत. या वेळी त्या म्युच्युअल फंडाविषयी आपल्याशी संवाद साधत आहेत. साध्या-सोप्या भाषेत त्या म्युचुअल फंडांबद्दल असलेल्या शंका दूर करतात आणि दाखवून देतात की, त्या शंकांच परिमार्जन कसं करायचं, रोख रकमेच्या प्रवाहाचं व्यवस्थापन कसं करायचं आणि मुलांच्या शिक्षणाचं नियोजन कसं करायचं, इथपासून स्वतःचं घर कसं घ्यायचं आणि निवृत्तीनंतरचं आयुष्य सुखकर होईल असं नियोजन कसं करायचं इथपर्यंत सगळं काही या पुस्तकात चर्चिलं गेलं आहे. तुमची आर्थिक उद्दिष्टं गाठण्याच्या मार्गावर म्युच्युअल फंडविषयी बोलू काही तुम्हाला आणून सोडतं. टिप्स नाहीत, युक्त्या प्रयुक्त्या नाहीत, फक्त एक शहाणपणाची पद्धत, जिच्यामुळे म्युच्युअल फंड्स तुमच्यासाठी चांगली कामगिरी करतील

- आपण कमवलेले पैसे कुठे जातात हे समजत नसेल आणि तुम्हाला आर्थिक यश प्राप्त करून समाधानी आयुष्य जगायचे असेल, तर हे पुस्तक नक्कीच तुमच्यासाठी आहे. - ‘अर्थसाक्षर व्हा !’ एकूण ६ भागांमध्ये विभागण्यात आले आहे. १. ओळख अर्थसाक्षरतेची २. आर्थिक नियोजन ३. विमा व कर्ज व्यवस्थापन ४. गुंतवणूक नियोजन ५. शेअर्स व म्युच्युअल फंड ६. आर्थिक फसवणुकींपासून सावधान ! - तुमचे उत्पन्न किती आहे यापेक्षा मिळवलेल्या पैशाचा विनियोग तुम्ही कसा करावा, योग्य आर्थिक नियोजन करून विविध ध्येये कशी साध्य करावी, विमा व कर्ज व्यवस्थापन कसे करावे, सुयोग्य गुंतवणूक करून तुमच्या बचतीच्या पैशाला कसे कामाला लावावे यांचे उत्तम मार्गदर्शन ‘अर्थसाक्षर व्हा!’ मध्ये वाचायला मिळते. About Author - सीए अभिजीत कोळपकर गेली अनेक वर्षे आर्थिक विषयांचे अभ्यासक आहेत. अर्थसाक्षरतेसारखा मोठा परीघ असलेला दुर्लक्षित पण महत्वाचा विषय सोप्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न लिखाणाद्वारे ते करतात.