Money Therapy (Marathi) + Guntavnukiche Smart Vyvasthapan (Marathi) - Combo of 2 Books | Zipri.in
                      Money Therapy (Marathi) + Guntavnukiche Smart Vyvasthapan (Marathi) - Combo of 2 Books

Money Therapy (Marathi) + Guntavnukiche Smart Vyvasthapan (Marathi) - Combo of 2 Books

Quick Overview

Rs. on ShopcluesBuy
Product Price Comparison

पैसा आपल्याला भेडसावणारा प्रश्न किंवा आयुष्याचा आनंद लुटण्याच्या मार्गातला अडथळा बनू नये असं वाटत असेल तर… पैशाबद्दल स्पष्ट बोलायचं म्हटलं तर… ते काही सोपं नाही. खरंतर, पैसा म्हणजे इथून तिथून टाळण्याचाच विषय असतो. इतकच नव्हे, तर पैसा हा आपल्या जीवनातील एकमेव विषय नसला तरी, प्रमुख चिंतांपैकी एक विषय नक्कीच बनला आहे. आणि तसं पाहिल, तर पैसा हा स्वत:च, ना चांगला असतो ना वाईट असतो. तो आपल्याला बंदिस्त करून ठेवतो आहे की आपल्या स्वातंत्र्याची किल्ली बनतो आहे ह्या प्रश्नाचं उत्तर, आपले त्याच्याबरोबरचे संबंध कसे असतातं ह्यावर ठरत असतं. जर का पैशाबरोबरच्या आपल्या संबंधांची आपण पूर्णपणे जाणीव ठेवली आणि त्या संबंधाकडे पूर्णपणे लक्ष दिलं, तर आपण आपल्या वैयक्तिक संपत्तीबरोबर निकोप आणि सकारात्मक संबंध निर्माण करू शकतो; मग आपली मिळकत कितीही भरभक्कम असो किंवा कितीही तुटपुंजी असो.
क्रिस्टिना बेनितो ह्या लेखिकेचं ह्या पुस्तकामागचं तत्त्वज्ञानच ते आहे. सारं आयुष्यभर त्यांनी अर्थशास्त्रज्ञ आणि वित्तीय सल्लागार म्हणून काम केले. पैशाबरोबरच्या आपल्या संबंधांच्या पूर्ण जाणिवेच्या तत्त्वांची आणि आपल्या आयुष्यातील चांगल्या सवयींची गाठ घालून, त्या एक आगळीवेगळी पद्धत सादर करत आहेत. तीन टप्प्यांत विभागलेल्या ह्यापद्धतीमार्फत आपल्याला आपल्या जवळची रक्कम अधिक चांगल्या रीतीने हाताळता येते, आपल्या आयुष्यावर ताबा मिळवता येतो आणि काळज्यांचं आपल्या डोक्यावरचं ओझं हलकं करता येतं.

गुंतवणूक या विषयाची माहिती घेणे टाळले तर त्यामुळे आपलेच दोन प्रकारे होत असते. एक, जास्त लाभ देणाऱ्या साधनांमध्ये गुंतवणूक न करता इतर साधनांमध्ये गुंतवणूक केल्यामुळे मिळणारा तुटपुंजा लाभ, मोठ्या लाभापासून वंचित राहणे हा व दुसरा गुंतवणुकीबाबत माहिती नसल्याने कोणीतरी सांगितलं आहे म्हणून चुकीच्या योजनांमध्ये गुंतवणूक करून स्वत:चे नुकसान करून घेणे. ऑनलाइन किंवा एसएमएस इत्यादी मार्गाने फसवणुकीचे प्रकार वाढत चाललेले आहेत. या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात अशी फसवणूक होऊ नये यासाठी कसे सावध राहावे याबाबतही लेख आहे. पुस्तकाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हे गुंतवणुकीसंबंधीचे पुस्तक असूनही त्यात अर्थव्यवस्थेसंबंधी एक लेख शेवटी दिलेला आहे, त्याचे कारण अर्थव्यवस्थेचा आणि आपल्या गुंतवणुकीचा आता निकटचा संबंध असतो. या पुस्तकाचा उपयोग तरुण, मध्यमवयीन, निवृत्त, वयस्कर सर्वच लोकांना होईल असा विश्वास आहे. आजची नियोजकपूर्वक, विचारपूर्वक योग्य गुंतवणूक घडवेल तुमच्या पुढील पिढीचे भविष्य व तुम्हाला मदत करेल तुमच्या निवृत्तीनंतरच्या जीवनासाठी. --- उदय कुलकर्णी