A Stranger In The Mirror (Marathi)(Paperback, Marathi, Sidney Sheldon, Madhav Karve) | Zipri.in
A Stranger In The Mirror (Marathi)(Paperback, Marathi, Sidney Sheldon, Madhav Karve)

A Stranger In The Mirror (Marathi)(Paperback, Marathi, Sidney Sheldon, Madhav Karve)

Quick Overview

Rs.410 on FlipkartBuy
Product Price Comparison
श्रीराम बुक एजन्सी c/o वेदांत पब्लिशिंग हाऊस - पुणे, सिडने शेल्डन यांची उत्कंठावर्धक कादंबरी 'ए स्ट्रेंजर इन द मिरर'. बोलक्या निळ्या डोळ्यांचा, निरागस बालसुलभ चेहेऱ्याचा, दणकट प्रकृतीचा, पौरुषत्वाची अफलातून देणगी लाभलेला 'टोबी टॅपल' हा कादंबरीचा नायक आहे. सांस्कृतिक संस्कार नसलेला 'टोबी' आईच्या इच्छेमुळे, प्रोत्साहनामुळे कलाकार होण्याची स्वप्ने पाहतो. हॉलिवूडसारख्या बड्या चित्रनगरीत खडतर प्रयत्नांनी आणि युक्तीने प्रवेश मिळवतो. 'क्लिफ्टन लॉरेन्स सारखा वडिलांच्या मायेनं प्रेम करणाऱ्या कलावंतांच्या प्रसिद्ध एजंटशी त्याचा संबंध येतो. बघता बघता 'टोबी टॅपल' सुपरस्टार होतो. यश टोबीच्या पायाशी लोळण घेतं. चित्रनगरीत टोबीला महत्त्वाचं स्थान प्राप्त होतं. त्याच्या इच्छेखातर बडेबडे निर्माते, दिग्दर्शक आपला निर्णय फिरवू लागतात. टोबीच्या आयुष्यातील अनेक तरुण व सुंदर मुलींपैकी हॉलिवूडच्या झगमगणाऱ्या रंगीबेरंगी दुनियेचं आकर्षण असलेली, श्रीमंत तरुणाच्या प्रेमभंगाने होरपळलेली 'जोसेफाइन झिन्स्की' हॉलिवूडच्या चित्रनगरीत 'जिल् कॅसल', अभिनय सम्राज्ञी होऊन श्रीमंती व ऐश्वर्याची स्वप्ने पाहात असते. पण दुर्दैवाने चित्रनगरीत अनेक बऱ्यावाईट अनुभवातून तिची फसवणूक झाल्याने, शेवटी ती अपयशाच्या कोंडीत असताना, 'टोबी टेंपल'च्या रूपाने आशेचा किरण तिला दिसतो. जिल् कॅसल 'मादाम टोबी टॅपल' होते. चित्रनगरीत झालेली मानहानी, शारीरिक विटंबना करणाऱ्यांचा सूड घेणं जिल्ला टोबीमुळे सहजसाध्य होतं. टोबीला यशाच्या शिखरावर पोचवण्याचं सर्व श्रेय, चित्रनगरीतील मोठमोठ्या कलाकारांचा एजंट क्लिफ्टन लॉरेन्सलाच. टोबीच्या आयुष्यात 'जिल् कॅसल'च्या आगमनामुळे तो दुखावला जातो व नंतर चित्रनगरीतून बाहेर फेकला जातो. खर्चिक लॉरेन्सला हलाखीचे जिणे जगावे लागते. आपल्या या दुरावस्थेला 'जिल्लू कॅसल'च कारणीभूत असल्याने तो तिच्यावर पाळत ठेवून, तिच्या लग्नाअगोदरच्या प्रेमप्रकरणाचा शोध घेऊन, तिच्यावर सूड उगवितो. टोबीचा गूढ मृत्यू, चित्रनगरीतील उलथापालथ, शृंगार, सूड, रहस्य यांनी ओतप्रोत अशा सिडने शेल्डन यांच्या बेस्ट सेलर्स कादंबरीचा तितकाच सरस अनुवाद.