Bloodline (Marathi)(Paperback, Marathi, Sidney Sheldon, Vijay Deodhar)
Quick Overview
Product Price Comparison
एका खानदानाची ही कहाणी! वंशपरंपरागत चालत आलेल्या 'रॉफ अँड सन्स' या अफाट औषध-उद्योग समूहाचा एकुलता एक वारस सॅम रॉफ... आणि कंपनीच्या भागीदार त्याच्या चुलत बहिणी अन् त्यांचे नादान नवरे... प्रत्येकालाच पैशाची अत्यंत निकड होती... आणि तो मिळवण्याचा एकमेव मार्ग होता... 'रॉफ अँड सन्स' पब्लिक कन्सर्न करणं... पण-सॅम रॉफचा याला कसून विरोध होता... परिणाम ? त्याचा 'अपघाती मृत्यू झाला... मग कंपनीची मालकी त्याची एकुलती एक मुलगी एलिझाबेथ हिच्याकडे आली... रूपसुंदर, निरागस, भावनाप्रधान, चतुर पण अनुभवी एलिझाबेथ... आणि-तिच्यावरही प्राणांतिक संकट कोसळली...! कुणीतरी तिच्या जिवावर उठलं होतं...!! तिच्याच आप्तांपैकी कुणीतरी...!!! आणि मग रहस्यमय घटनांची एक मालिकाच सुरू झाली- ब्लडलाइन