Majhi Jeevangatha Majhyach Shabdat - Krishna (Marathi)(Marathi, Paperback, Deep Trivedi)
Quick Overview
Product Price Comparison
‘माझी जीवनगाथा, माझ्याच शब्दांत - कृष्ण’- दीप त्रिवेदीपुस्तकाविषयीकृष्ण हे एक असे प्रभावी व्यक्तिमत्व आहे ज्याच्याविषयी प्रत्येकाला जाणून घ्यायचे आहे, समजून घ्यायचे आहे. परंतु दुर्दैवाने, हेच एक असे जीवन आहे, जे संपूर्ण स्वरुपात, तपशीलात एके ठिकाणी उपलब्ध नाही. त्यामुळेच कृष्ण आणि त्याच्या जीवनासंदर्भात उपस्थित होणारे तमाम प्रश्न कायमच अनुत्तरीत राहिले आहेत.* कृष्ण कंसाच्या कारागृहातून बाहेर कसा आला?* कृष्ण-राधा यांचे प्रेम नेमके कसे होते?* कृष्ण-राधा यांचा वियोग का आणि कसा झाला?* कृष्णाची रासलीला म्हणजे नेमके काय?* कृष्णाने कंसाचा वध का केला?* कृष्ण आणि रुक्मिणी यांच्यातील प्रेम कसे होते?* कृष्णाने इतके वध का केले?* कृष्णाने साध्या गवळ्यापासून द्वारकाधीश बनण्यापर्यंतचा प्रवास कसा पार पाडला?* कृष्णाने किती विवाह केले? * कृष्णाला किती अपत्ये होती? * यादवस्थळी म्हणजे नेमके काय?असे हजारो प्रश्न कृष्णाच्या जीवना संदर्भात नेहमी पडतच राहतात. परंतु त्यांची उत्तरे मात्र मिळत नाहीत. कारण कोणताही एक असा ग्रंथ नाही जो निव्वळ कृष्णाच्या जीवनाच्या संदर्भात लिहिला गेला असेल वा ज्यात कृष्णाचे संपूर्ण जीवन उपलब्ध असेल. म्हणूनच हे पुस्तक कृष्णाच्या संदर्भात आजतागायत लिहिल्या गेलेल्या सगळ्या शास्त्रांना धुंडाळून लिहिले गेले आहे. या शास्त्रांपैकी प्रमुख आहेत : महाभारत, शतपथ ब्राह्मण, ऐतरेय आरण्यक, निरुक्त, अष्टाध्यायी, गर्ग संहिता, जातक कथा, अर्थशास्त्र, इंडिका, हरिवंश पुराण, विष्णु पुराण, महाभाष्य, पद्म पुराण, मार्कंडेय पुराण आणि कूर्म पुराण.या पुस्तकाबद्दल एका वाक्यात सांगायचे झाल्यास असे म्हणता येईल की साधा गवळी असलेला कान्हा ‘जय श्रीकृष्ण’ बनण्याची ही संपूर्ण कहाणी आहे, जिच्या माध्यमातून कृष्णाचे समग्र जीवन त्याच्या मानसिकतेसह तपशीलात समजून घेता येऊ शकते. कृष्णाचे अवघे जीवन यात एका अत्यंत रोचक कहाणीच्या स्वरुपात सादर केले गेले आहे. हे पुस्तक मराठीसोबत इंग्रजी, हिंदी आणि गुजरातीमध्येही उपलब्ध आहे.