The Godfather Returns(Marathi )(Paperback, Marathi, Mario Puzo, Dr. Ajit Katre)
Quick Overview
Product Price Comparison
गेल्या शतकाच्या मध्यावर अमेरिकेच्या गुन्हेगारी जगताची कथा सांगणाऱ्या आणि त्याचा अमेरिकेतील राजकीय कायदेशीर आणि मनोरंजनाच्या क्षेत्रावर झालेला परिणाम विषद करणाऱ्या 'द गॉडफादर रिटन्र्स' या कादंबरीने वॉशिंग्टन, न्यूयॉर्कपासून लास वेगास आणि क्युबापर्यंत सर्वत्र खळबळ माजवली आणि लोकप्रियतेचे उच्चांक गाठले. मार्क वाइनगार्डनरने मारिओ पुझोची अलौकिक पात्रे आणि कथेचे मुख्य सूत्र कायम ठेवले, परंतु त्याच बरोबर स्वतःची तेवढीच अविस्मरणीय नवीन पात्रे निर्माण केली. "द गॉडफादर रिटर्न्स' ही कादंबरी म्हणजे आपले प्रेम, ओढ कधी आपल्याला वाटणारी भीती, आपले कुटुंब यांचीच कथा आहे असे आपल्याला वाटू लागते, आणि हेच या कादंबरीच्या यशाचे मुख्य रहस्य आहे असे म्हणता येईल.मार्क वाइनगार्डनर यांनी जॉर्ज मॅसोन विद्यापीठातून 'कादंबरी लिखाण' या विषयात 'मास्टर ऑफ फाईन आर्टस' ही पदवी प्राप्त केली आणि वयाच्या सव्वीसाव्या वर्षी पदवीचे शिक्षण चालू असतानाच पहिले पुस्तक प्रसिद्ध केले.