Abhivyaktiswatantrya Prasarmadhyame ani Kayada (Marathi) | Zipri.in
                      Abhivyaktiswatantrya Prasarmadhyame ani Kayada (Marathi)

Abhivyaktiswatantrya Prasarmadhyame ani Kayada (Marathi)

Quick Overview

Rs. on ShopcluesBuy
Product Price Comparison

"मराठी भाषेत अभिव्यक्तिस्वातंत्र्य याविषयावर अत्यंत तुरळक लेखन उपलब्ध आहे. जे आहे ते अद्ययावत नाही. सदर पुस्तकाचे लिखाण दोन विद्यापीठांचा अभ्यासक्रम समोर ठेवून केलेले आहे. त्यात प्रसंगोचित नवनवीन विषयांची भर टाकली आहे. अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे बहुतांश सर्व पैलू पुस्तकात समाविष्ट करण्याचा अटोकाट प्रयत्न केला आहे. या पुस्तकाच्या लेखनात कायद्याच्या तरतुदी जशाच्यातशा पुनर्मुद्रित न करणे, शक्यतो या तरतुदींचे शब्दश: भाषांतर टाळणे याकडे विशेष कटाक्ष होता. विशिष्ट पाठामागची मूळ संकल्पना, मूलभूत व्याख्या या अधिक सुलभ आणि रोचकपणे वाचकांपुढे ठेवाव्यात यावर भर दिला आहे. समाजमाध्यमे, ओटीटी यांसारख्या नवीन माध्यमांमुळे अभिव्यक्तीचे क्षितिज अभूतपूर्वरीत्या विस्तारत आहे, नवनवीन आयामांद्वारे लोक अभिव्यक्तीचे नवीन प्रयोग उत्साहापूर्वक स्वीकारत आहेत. हा विस्तार असाच होत राहील. अभिव्यक्तीच्या नित्य नव्या परिमाणांना आजमावत व्यक्तिस्वातंत्र्याचा मूलमंत्र उपलब्ध मर्यादांच्या कक्षेत अधिकाधिक प्रभावीपणे कसा उच्चारता येईल हे बघणे गरजेचे आहे. या प्रवासात वाचकांना हे पुस्तक उपयुक्त ठरेल अशी आशा आहे.