Arthasakshar Vha ! (Marathi) + Guntavnukiche Smart Vyvasthapan (Marathi) - Combo of 2 Books | Zipri.in
                      Arthasakshar Vha ! (Marathi) + Guntavnukiche Smart Vyvasthapan (Marathi) - Combo of 2 Books

Quick Overview

Rs. on ShopcluesBuy
Product Price Comparison

आर्थिक स्वातंत्र्याचा अर्थ तुमच्यासाठी पुढीलपैकी काहीही असू शकतो : आपल्याला हवं तसं आयुष्य जगणं, दुसऱ्या कोणीतरी आखलेल्या वेळापत्रकानुसार काम करावं न लागणं, पुन्हा कधीही पैशांची चिंता करावी न लागणं किंवा इतर एखादं स्वप्न पूर्ण करणं. मात्र, गुंतवणूक करणं हाच यांपैकी कुठलाही अर्थ प्रत्यक्षात उतरवण्याचा मार्ग असतो. या मुद्देसूद आणि सहज उपलब्ध असलेल्या पुस्तकातून बेन कार्ल्सन आणि रॉबिन पॉवेल तुम्हाला सुज्ञपणे केलेल्या बचतीच्या आणि थेट गुंतवणुकीच्या माध्यमातून आर्थिक स्वातंत्र्याच्या मार्गावर कशी पावले टाकावीत, ते दाखवतात. हे पुस्तक झटपट श्रीमंत कसे व्हावे याविषयीचे नाही. मात्र, ते नक्कीच विश्वासार्हपणे श्रीमंत होण्याविषयीचे आहे. आर्थिक स्वातंत्र्याचं दीर्घकालीन उद्दिष्ट बाळगून गुंतवणुकीच्या माध्यमातून संपत्तीची उभारणी करण्यासाठी शिस्त, त्याग आणि वेळ यांची गरज असते ; परंतु ते शक्य असतं आणि जवळजवळ प्रत्येक जणच ते करूही शकतो.पण त्यासाठी योग्य माहिती मिळणं अतिशय गरजेचं असतं.

- आपण कमवलेले पैसे कुठे जातात हे समजत नसेल आणि तुम्हाला आर्थिक यश प्राप्त करून समाधानी आयुष्य जगायचे असेल, तर हे पुस्तक नक्कीच तुमच्यासाठी आहे. - ‘अर्थसाक्षर व्हा !’ एकूण ६ भागांमध्ये विभागण्यात आले आहे. १. ओळख अर्थसाक्षरतेची २. आर्थिक नियोजन ३. विमा व कर्ज व्यवस्थापन ४. गुंतवणूक नियोजन ५. शेअर्स व म्युच्युअल फंड ६. आर्थिक फसवणुकींपासून सावधान ! - तुमचे उत्पन्न किती आहे यापेक्षा मिळवलेल्या पैशाचा विनियोग तुम्ही कसा करावा, योग्य आर्थिक नियोजन करून विविध ध्येये कशी साध्य करावी, विमा व कर्ज व्यवस्थापन कसे करावे, सुयोग्य गुंतवणूक करून तुमच्या बचतीच्या पैशाला कसे कामाला लावावे यांचे उत्तम मार्गदर्शन ‘अर्थसाक्षर व्हा!’ मध्ये वाचायला मिळते. About Author - सीए अभिजीत कोळपकर गेली अनेक वर्षे आर्थिक विषयांचे अभ्यासक आहेत. अर्थसाक्षरतेसारखा मोठा परीघ असलेला दुर्लक्षित पण महत्वाचा विषय सोप्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न लिखाणाद्वारे ते करतात.