Blaze A Son's Trial by Fire (Marathi) | Zipri.in
                      Blaze A Son's Trial by Fire (Marathi)

Blaze A Son's Trial by Fire (Marathi)

Quick Overview

Rs. on ShopcluesBuy
Product Price Comparison

एक रोग-स्पष्टच बोलायचं तर कर्करोग हा आत्मविकासाचं महत्वाचं साधन होऊ शकतो का?आत्मविकास रोग्याचा आणि त्याची काळजी घेणाऱ्या व्यक्तींचाही -विशेषत: त्याचे आईवडील?

जेव्हां एखादा रोग होतो तेव्हांच आपल्याला आरोग्याची किंमत जाणवते.जे आता आपल्याजवळ नसतं.तरीही एखादा हरवलेला मित्र शोधून काढण्याचा प्रवास हा आपल्याला दु:खमुक्ती करून घेण्याच्या आणि स्वत:चा शोध घेण्याच्या अनेक प्रकारच्या संधी उपलब्ध करून देत असतो.आत्मशोधाच्या या कठीण मार्गावर कसा प्रवास करायचा हे आपणच ठरवायचं असतं.

कर्करोग झालेली एखादी व्यक्ती ही केवळ या रोगामधून मुक्तता मिळवण्याचा मार्ग शोधत असते असं सरसकट विधान करणं योग्य नाही हे काळानंच आम्हाला दाखवून दिलं आहे.बहुतेक वेळा हे असं सरसकट विधान आपल्या आजूबाजूच्या समाजामधूनच.आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे वैद्यकीय वर्तुळातूनही निर्माण झालेलं असतं.पुष्कळ वेळा वैद्यकीय समाज हा एका बिंदूच्या पलीकडे जाऊ शकलेला नसतो.त्यानंतर तुम्हाला आता सगळं संपलं आता आपला काही उपयोग नाही असं वाटायला लागतं.हे सारे नकारात्मक विचार रुग्ण आणि त्याचे आप्तस्वकीय यांना त्या रोगाच्या दुष्टचक्रामध्ये असं ढकलून देतात की प्रत्यक्ष मरण येण्याआधीच ते कितीतरी वेळा मरण पावलेले असतात. कर्करोगाचा हा सर्वात घातक प्रकार आहे ज्यानं आपणा सर्वांच्या मनोवृत्तींना ग्रासून टाकलेलं आहे.

दिव्यांश आत्मनच्या बाबतीत मात्र असं झालं नाही.प्रतिकूल परिस्थितीमध्येही ठामपणे उभा राहाणारा दिव्यांश हा शौर्याचं धैर्याचं प्रतीकच होता.त्याच्या आयुष्याचा हा प्रवास आपल्याला प्रतिकूल परिस्थितीमध्येही संधींचा मार्ग कसा शोधता येतो हे स्पष्टपणे दर्शवतो. तो एक असं अर्थपूर्ण आणि भव्य आयुष्य जगला ज्याचा त्याच्या आजूबाजूच्या लोकांवर फार मोठा परिणाम झाला आहे.

ब्लेझहा दिव्यांशच्या आयुष्याचा स्फूर्तिप्रद प्रवास आणि त्याबरोबरच त्याच्या आईचं उमलत गेलेलं मातृत्व हे वाचकापुढे मांडण्याचा एक प्रयत्न आहे. त्याच्या रीबर्थ’ या कवितेतल्या काही ओळी इथे अगदी चपखल बसणाऱ्या आहेत.