Mala Shastradnya Vhaych Aahe | Zipri.in
                      Mala Shastradnya Vhaych Aahe

Mala Shastradnya Vhaych Aahe

Quick Overview

Rs. on ShopcluesBuy
Product Price Comparison

मला शास्त्रज्ञ व्हायचं आहे । डॉ. शंतनू अभ्यंकर आकर्षक चित्रांसह संपूर्ण पुस्तक आर्ट पपेरवर छपाई या पुस्तकात विज्ञानाबद्दल आणि त्याच्या प्रभावाबद्दल खूप काही सांगितले आहे. किशोरांना सहज समजेल, आवडेल असे हे लेखन आहे. विविध प्रश्नांची उत्तरे विज्ञान कसे शोधते, हे सोप्या भाषेत सांगितले आहे. सतत प्रयोग करणे, निरीक्षणे नोंदवणे, तर्कशुद्ध निष्कर्ष काढणे, गृहितके चुकली तर सुधारणे, या रीतीने विज्ञानाची प्रगती होते. हे सारे इथे रंजक उदाहरणातून येते. पुरातन धर्म संस्थापकांचे तर्क सत्य म्हणून स्वीकारायचे, की विज्ञानाने पुरावा देऊन सिद्ध केलेली विधाने स्वीकारायची, हे वाचकांनी ठरवायचे आहे. असे विवेकी विचार शिकवणारे लिखाण फार जरुरी आहे. लहानांइतकेच मोठ्यांनाही आवडेल, विचार करायला उद्युक्त करेल, असे हे लेखन आहे. - डॉ. जयंत आणि मंगला नारळीकर