Nankatai (Marathi) | Zipri.in
                      Nankatai (Marathi)

Nankatai (Marathi)

Quick Overview

Rs. on ShopcluesBuy
Product Price Comparison

माझं दुसरं किंवा तिसरं पुस्तक आलं तेव्हा आयुष्यात दहा पुस्तकांचा पल्ला गाठायचा हे माझं मनाच्या कोपऱ्यातलं रम्य स्वप्न होतं. आज मी तिसाव्या पुस्तकाच्या उंबरठ्यावर उभा आहे. 'खटलं आणि खटला' हे माझं पुढलं पुस्तक तिसावं असेल. पण या आकड्यांच्या खेळात मला आता रस वाटेनासा झालाय. तीस पुस्तकं म्हणजे मोठा वाघ मारलाय असं मला वाटत नाही. उद्या अगदी पन्नास झाली तरी, ठीक आहे यार, अशीच माझी उदासीन भूमिका असेल. पुस्तकांच्या संख्येपेक्षा वाचनीय मजकूर किती याचं महत्त्व जास्त वाटू लागलंय. वय किती यापेक्षा एवढ्या वर्षांत केलं काय, हे महत्त्वाचं. ज्यांच्याजवळ सांगण्यासारखं काही नसतं ते वयाचा दाखला देताना आपण नेहमी पाहतो. पुस्तकांच्या संख्येविषयी बोलणं मला तसंच अर्थहीन वाटायला लागलंय.