Yaadon Ki Baarat (Marathi) | Zipri.in
                      Yaadon Ki Baarat (Marathi)

Yaadon Ki Baarat (Marathi)

Quick Overview

Rs. on ShopcluesBuy
Product Price Comparison

यादोंकी बारात' हे कणेकरांचं नवीन पुस्तक ही हिंदी चित्रपटसृष्टी व चित्रपट संगीत या विषयांनाच वाहिलेलं आहे. पण त्याबरोबर या पुस्तकात आणखीही एक गोष्ट प्रामुख्यानं आढळते. हिंदी चित्रपटसृष्टीमधल्या जवळजवळ गेल्या तीन पिढ्यातले अनेक लहान-मोठे, यशस्वी- अयशस्वी, नामवंत - अनामिक अभिनेते व अभिनेत्री यांची अतिशय हृदयंगम आणि हृदयस्पर्शी शब्दचित्रं कणेकरांनी इथं मोठ्या तळमळीनं आणि जाणकारीनं रेखाटली आहेत. लेखक म्हणतो त्याप्रमाणं खरोखरीच ही 'यादोंकी बारात'- स्मृतींची मिरवणूक आहे. ती मिरवणूक बघताना हिंदी चित्रपटसृष्टीचा जवळजवळ प्रारंभापासूनचा इतिहास आपणासमोर भर्रकन उलगडत जातो. नाना प्रकारच्या भावना मनात उचंबळून येतात. एकंदरीनं कणेकरांची ही 'यादों की बारात' आपलं चित्त वेधून घेते यात शंका नाही. हे लेख जेव्हा वृत्तपत्रात छापून येत होते तेव्हाच त्यांनी चित्ररसिकांची मान्यता मिळवली होती. आता पुस्तकात ते लेख सलग, एकत्रितपणं वाचताना वाचकांना ते अधिकच आवडतील अशी माझी खात्री आहे. शिरीष कणेकरांच्या या 'यादों की बारात'चं मी मनःपूर्वक स्वागत करते.